जाहिरात

MS Dhoni BCCI Pension: 1000 कोटींचा मालक असलेल्या धोनीला किती मिळतो लष्कराकडून पगार आणि BCCIकडून पेन्शन?

M S Dhoni Salary: एमएस धोनीला भारतीय प्रादेशिक सेनेत (Territorial Army) लेफ्टनंट कर्नल पदाची मानद पदवी मिळाली आहे. पण त्याला लष्कराकडून पगार मिळतो का? आणि BCCI त्याला किती पेन्शन देते? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

MS Dhoni BCCI Pension: 1000 कोटींचा मालक असलेल्या धोनीला किती मिळतो लष्कराकडून पगार आणि BCCIकडून पेन्शन?
"MS Dhoni News: एमएस धोनीला BCCI कडून किती पेन्शन मिळते"

M S Dhoni Salary: महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानावरील कामागिरीसोबतच त्याच्या देशप्रेमासाठीही ओळखला जातो. वर्ष 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीला भारतीय प्रादेशिक सेनेत (Territorial Army) 'लेफ्टनंट कर्नल' ही मानद पदवी देण्यात आली होती. धोनीला लष्कराकडून किती पगार मिळतो आणि निवृत्तीनंतर बीसीसीआयकडून (BCCI) किती पेन्शन मिळते? असा प्रश्न अनेकदा चाहत्यांच्या मनात येतो. चला तर मग जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती... 

लष्कराकडून धोनीला पगार मिळते का?

भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याचा मासिक पगार सामान्यतः 1.21 लाख रुपयांपासून ते 2.12 लाख रुपयांच्या दरम्यान असतो, ज्यामध्ये अनेक भत्त्यांचाही समावेश असतो.

काय आहेत नियम?

नियमांनुसार 'मानद पदवी' (Honorary Rank) मिळालेल्या नामांकित व्यक्तींना नियमित अधिकाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन किंवा कोणतेही आर्थिक लाभ दिले जात नाहीत. धोनीने हे पद तरुणांना लष्करात सामील होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने स्वीकारले आहे. पण जेव्हा कधी तो लष्कराच्या ड्युटीवर किंवा ट्रेनिंगसाठी जातो, तेव्हा त्याला लष्कराचे सर्व निश्चित नियम, प्रोटोकॉल आणि सुविधा दिल्या जातात. 

(नक्की वाचा: Arjun Tendulkar: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...)

BCCI कडून दरमहा मिळते एवढी पेन्शन

माजी खेळाडूंच्या सन्मानासाठी बीसीसीआय (BCCI) एक विशेष पेन्शन योजना चालवते. वर्ष 2022 मध्ये करण्यात आलेल्या बदलांनुसार माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यात आली होती. नियमांनुसार 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी (Test) सामने खेळलेल्या माजी पुरुष क्रिकेटपटूंना प्रति महिना 70,000 रुपये पेन्शन दिली जाते.

(नक्की वाचा : IPL 2026 : ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला! 'या' 5 खेळाडूंची CSK करणार हकालपट्टी?)

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्याने भारतासाठी 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. या निकषानुसार धोनी सर्वात उच्च श्रेणीत (स्लॅबमध्ये) येतो आणि त्याला बीसीसीआयकडून दरमहा 70,000 रुपये पेन्शन मिळते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com