जाहिरात

कमबॅक करावं तर असं... Ishan Kishan चा जोरदार धमाका, टीम इंडियातील जागेवर ठोकला दावा

Ishan Kishan Sealed The Game : टीम इंडियाचा विकेट किपर बॅटरन  इशान किशननं जोरदार कमबॅक केलं आहे.

कमबॅक करावं तर असं... Ishan Kishan चा जोरदार धमाका, टीम इंडियातील जागेवर ठोकला दावा
Ishan Kishan
मुंबई:

Ishan Kishan Sealed The Game With Two Powerful Sixes: टीम इंडियाचा विकेट किपर बॅटरन  इशान किशननं जोरदार कमबॅक केलं आहे. बुची बाबू करंडक स्पर्धेतील रंगतदार सामन्यात इशान किशनच्या निर्णायक खेळीमुळे झारखंडला विजय मिळवता आला. झारखंड विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात सामना झाला. झारखंडनं हा सामना इशानच्या सिक्सरच्या जोरावर फक्त 2  विकेटने जिंकला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मध्य प्रदेश विरुद्धच्या या सामन्यात इशाननं पहिल्या इनिंगमंध्ये सेंच्युरी झळकावली होती. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये 58 बॉलमध्ये नाबाद 41 रन काढले. दुसऱ्या बाजूनं सातत्यानं विकेट्स पडत असताना इशान एका बाजूला उभा होता. त्यानं सलग 2 सिक्स लगावत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

( नक्की वाचा : मायदेशी परतताच बदललं मन, विनेश फोगाटनं केली मोठी घोषणा )
 

 कसा खेळला इशान?

मध्य प्रदेशनं दिलेल्या 175 रनच्या टार्गेटचा पाठलाग करताना झारखंडची अवस्था 6 आऊट 135 झाली होती. त्यावेळी इशान मात्र दुसऱ्या बाजूनं शांतपणे एकेरी-दुहेरी रन काढत स्कोअर वाढवत होता. झारखडंचे 163 रन होईपर्यंत आणखी 2 बॅटर आऊट झाले. त्यावेळी इशाननं परिस्थितीची गांभीर्य ओळखून गियर बदलला. त्यानं सलग दोन सिक्स लगावत धोनी स्टाईलनं मॅच संपवली. 

मध्य प्रदेशचा दुसऱ्या इनिंगमधील सर्वात यशस्वी बॉलर आकाश राजावतलाच इशाननं लक्ष्य केलं. आकाशनं त्यापूर्वी इनिंगमध्ये 4 विकेट्स घेत झारखंडला अडचणीत आणलं होतं. पण इशाननं त्यालाच सलग दोन सिक्स लगावत मॅच स्वत:च्या टीमच्या बाजूनं  निकाली काढली.

( नक्की वाचा : एका मोठ्या चुकीमुळे टीम इंडियाच्या हातामधून निसटली श्रीलंका सीरिज, अंपायर्सनीही दिली कबुली )
 

इशान किशननं पहिल्या इनिंगमध्ये आक्रमक बॅटिंग करत फक्त 86 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. त्यानं 107 बॉलमध्ये 5 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीनं 114 रन काढले होते. बूची बाबू स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर इशान किशननं बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी दावेदारी सादर केली आहे. आगामी सीरिजसाठी निवड समिती लवकरच टीमची घोषणा करणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मायदेशी परतताच बदललं मन, विनेश फोगाटनं केली मोठी घोषणा
कमबॅक करावं तर असं... Ishan Kishan चा जोरदार धमाका, टीम इंडियातील जागेवर ठोकला दावा
Vinesh Phogat awarded gold medal by community elders in her native village haryana
Next Article
Vinesh Phogat : अखेर तिने जिंकलं! विनेश फोगाटचा सुवर्ण पदकाने गौरव