जाहिरात
Story ProgressBack

USA विरुद्ध टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट! विराटबाबतही मोठी बातमी

IND vs USA T20 WC 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियानं सलग दोन विजय मिळवले आहेत. भारतीय टीमचा तिसरा सामना यजमान अमेरिकेशी आज (12 जून) होणार आहे.

Read Time: 2 mins
USA विरुद्ध टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट! विराटबाबतही मोठी बातमी
Team India Predicted Playing XI (Photo AFP)
मुंबई:

India Predicted Playing XI vs USA, T20 World Cup 2024:  टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियानं सलग दोन विजय मिळवले आहेत. भारतीय टीमचा तिसरा सामना यजमान अमेरिकेशी आज (12 जून) होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये होणारा हा सामना जिंकून सुपर 8 मधील जागा पक्की करण्याच्या निश्चयानं भारतीय टीम मैदानात उतरणार आहे. अमेरिकेनंही या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय टीम भक्कम प्लेईंग 11 सह मैदानात उतरेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय टीममध्ये होणार एक बदल?

अमेरिकेविरुद्ध कॅप्टन रोहित शर्मासह यशस्वी जैस्वालला ओपनिंगला येऊ शकतो. या स्पर्धेत ऑल राऊंडर शिवम दुबे पहिले दोन सामने खेळला. पण, त्याला फारशी कमाल करता आली नाही. तर रोहितसोबत ओपनिंगला आलेल्या विराट कोहलीला देखील मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आलं. त्यामुळे यशस्वीचा टीममध्ये समावेश करुन विराटला त्याच्या आवडीच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयोग टीम इंडिया करु शकते. 

अमेरिकेविरुद्ध टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची जबाबदारी विराट कोहलीसह ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवर राहील. पंतनं या स्पर्धेत चांगल्या लयमध्ये आहे. तर विराटचा तिसऱ्या क्रमांकावरचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. सूर्यकुमार यादवमध्ये आक्रमक बॅटिंग करण्याची क्षमता आहे. या सर्वांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केला तर टीम इंडिया मोठा स्कोअर नक्की करु शकते.  

 ( नक्की वाचा : अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बाबर आझमनं कुणावर फोडलं खापर? )
 

रोहित शर्मा या मॅचमध्ये 3 ऑलराऊंडरसह उतरु शकतो. हार्दिक पांड्यासह रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांची नावं निश्चित मानली जात आहेत. या तिघांनीही या स्पर्धेत आत्तापर्यंत समाधानकारक कामगिरी केलीय. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग हे तीन्ही फास्ट बॉलर दमदार कामगिरी करत असून त्यांची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित आहे. 

अमेरिकेविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
MCA President Amol Kale : भारत-पाकिस्तान मॅचनंतर मुंबई क्रिकेटच्या अध्यक्षांचा अमेरिकेत मृत्यू
USA विरुद्ध टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा होणार पत्ता कट! विराटबाबतही मोठी बातमी
t20-world-cup-at-this-stage-players-mobile-phone-are-taken-away-from-them-before-the-match-know rule
Next Article
T20 WC : मॅचपूर्वी 'या' वेळेला जमा केले जातात खेळाडूंचे मोबाईल, वाचा काय आहे नियम?
;