ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दहा गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये मोठा धक्का बसला आहे. भारत पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे विजयासह ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसऱ्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाला आता आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. या पराभवामुळे भारताची विजयाची टक्केवारी 61.11 वरून 57.29 इतकी कमी झाली.
(नक्की वाचा- IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 10 विकेट्सने पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत)
आजच्या विजयासह ऑस्ट्रेलियाने सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पोहोचण्यासाठी नववा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 57.69 वरून 60.71 वर पोहोचली आहे. भारताला आता इतर संघांवर अवलंबून न राहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामने जिंकावे लागतील. संघासाठी हे कठीण काम असेल, कारण ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत करणे सोपे नाही.
(नक्की वाचा- IND vs AUS Pink Ball Test : भर मैदानात संतापला सिराज, लबुशेनच्या दिशेनं बॉल फेकला, पाहा Video)
इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, भारतानंतर श्रीलंका संघ चौथ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 50 आहे. श्रीलंका देखील सध्या WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा दावेदार आहे. या यादीत इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे संघ पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. पॉइंट टेबलमध्ये बांगलादेश संघ आठव्या क्रमांकावर आहे आणि वेस्ट इंडिजचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.