जाहिरात

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 10 विकेट्सने पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत

भारताने ऑस्ट्रेलियासमोर 19 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 10 विकेट्सने पराभव, मालिका 1-1 अशी बरोबरीत

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त पलटवार केला आणि ॲडलेडमध्ये टीम इंडियाचा दहा गडी राखून पराभव केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारताने ऑस्ट्रेलियासमोर 19 धावांचे लक्ष्य दिले होते. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे..

भारताचा दुसरा डाव अवघ्या 175 धावांवर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 337 धावा केल्या. अशा प्रकारे त्यांच्याकडे दुसऱ्या डावात 157 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताने 175 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियावर 18 धावांची आघाडी घेतली आणि कांगारूंना 19 धावांचे लक्ष्य दिले.

(नक्की वाचा : सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप)

तिसऱ्या दिवशी काय झालं?

टीम इंडियाने रविवारी पाच विकेट्सवर 128 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मात्र त्यापुढे 47 धावांवर उर्वरित पाच विकेट गमावल्या. टीम इंडियाला आज ऋषभ पंतच्या रूपाने पहिला धक्का बसला. पंतर 28 धावा करुन बाद झाला. यानंतर अश्विन काही विशेष करू शकला नाही आणि सात धावा करून पॅव्हेलियन परतला. 

(नक्की वाचा-  IND vs AUS Pink Ball Test : भर मैदानात संतापला सिराज, लबुशेनच्या दिशेनं बॉल फेकला, पाहा Video)

हर्षित राणा शुन्यावर बाद झाला. नितीश रेड्डीने एकाकी झुंज दिली. त्याने 47 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. अखेर भारताचा डाव 175 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने पाच, तर स्कॉट बोलंडने तीन विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्कने दोन विकेट घेतल्या.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com