जाहिरात

Vaibhav Suryavanshi : 'पापा प्रणाम...' विक्रमी खेळीनंतर वैभवनं सर्वात पहिल्यांदा केला वडिलांना फोन, पाहा इमोशनल Video

Vaibhav Suryavanshi phone call to father: आयपीएलमधील विक्रमी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीनं वडिलांना केलेला पहिला फोन व्हायरल झाला आहे.

Vaibhav Suryavanshi : 'पापा प्रणाम...' विक्रमी खेळीनंतर वैभवनं सर्वात पहिल्यांदा केला वडिलांना फोन, पाहा इमोशनल Video
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं आयपीएलमध्ये इतिहास घडवला आहे.

Vaibhav Suryavanshi phone call to father: आयपीएल 2025 मधील 47 व्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं इतिहास घडवला. 14 वर्षांच्या वैभवनं राजस्थान रॉयल्सकडून फक्त 35 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. या ऐतिहासिक खेळीनंतर वैभवनं सर्वात पहिल्यांदा त्याचे वडिल संजीव सूर्यवंशी यांना फोन केला. ही मॅच संपल्यानंतर पहिला फोन कुणाला करणार असा प्रश्न राजस्थान रॉयल्सच्या टीमनं त्याला विचारला होता. त्यावेळी वैभवनं थोडसं लाजत पहिला फोन वडिलांना करणार असल्याचं सांगितलं. संजीव यांनी त्याचा फोन उचलल्यानंतर वैभवनं 'पापा प्रणाम' या वाक्यानं त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संजीव सूर्यवंशी यांनी यावेळी रोमी भिंडर यांचे आभार मानले. रोमी यांनीच ट्रायलच्या वेळी वैभवची गुणवत्ता ओळखली होती. यावेळी रोमी भिंडर यांनी संजीव यांना कसं वाटतंय? असं विचारलं. त्यावर संजीव यांनी 'मी स्वप्न पाहतोय असं वाटतंय' असं सांगितलं. राजस्थान रॉयल्सनं हा व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये माझा फोन सतत वाजत आहे, असं वैभवच्या वडिलांना त्याला सांगितल्याचं दिसतंय. 'ठीक आहे, पापा प्रणाम. रुममध्ये गेल्यानंतर बोलूया' असं सांगून वैभवनं फोन ठेवला. 

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi :वडिलांनी जमीन विकली, बेरोजगार झाले, वैभव सूर्यवंशीला घडवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट! )

वैभव सूर्यवंशी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा भारतीय बनला आहे. त्यानं गुजरात टायन्सविरुद्ध 35 बॉलमध्ये सेंच्युरी केली. यापूर्वी हा रेकॉर्ड टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युसूफ पठाणच्या (37 बॉल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) नावावर होता. 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात कमी वयात (14 वर्ष 32 दिवस) वयात सेंच्युरी करण्याचा विक्रमही वैभवच्या नावावर झालाय. यापूर्वी हा विक्रम मनिष पांडेच्या (19 वर्ष 253 दिवस) नावावर होता. वैभवच्या सेंच्युरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्सनं गुजरात टायटन्सवर मोठा विजय मिळवला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: