जाहिरात

VIDEO: वैभव सूर्यवंशीच्या सेंच्युरीनंतर उभा राहिला जखमी राहुल द्रविड, T20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच घडलं...

Rahul Dravid Celebration on Vaibhav Suryavanshi Century : 14 वर्षांच्या वैभवनं सेंच्युरी झळकावल्यानंतर जे सेलीब्रेशन सुरु होतं, त्यामध्ये एका दृश्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

VIDEO: वैभव सूर्यवंशीच्या सेंच्युरीनंतर उभा राहिला जखमी राहुल द्रविड, T20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच घडलं...
मुंबई:

Rahul Dravid Celebration on Vaibhav Suryavanshi Century IPL 2025: वैभव सूर्यवंशी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी नाव नोंदवल्यापासूनच  रेकॉर्ड करत आहे. त्याला अवघ्या 13 व्या वर्षी  1.1 कोटी रुपयांची बोली लावून राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळेल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. पण, तो आयपीएल खेळला आणि आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा भारतीय बनला. त्यानं फक्त 35 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली. या सेंच्युरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं 8 विकेट्सनं गुजरात टायटन्सवर मोठा विजय मिळवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वैभव सूर्यवंशीनं आयपीएल कारकि‍र्दीमध्ये पहिली सेंच्युरी करताच इतिहास घडवला. त्यानं 94 वर खेळत असताना लेग साईडला थेट सिक्स लगावत सेंच्युरी पूर्ण केली. त्यावेळी संपूर्ण स्टेडियमनं या ऐतिहासिक खेळीसाठी त्याला मानवंदना दिली. आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट आपण पाहात आहोत अशीच त्यावेळी मैदानातील प्रत्येकाची भावना होती. 

14 वर्षांच्या वैभवनं सेंच्युरी झळकावल्यानंतर जे सेलीब्रेशन सुरु होतं, त्यामध्ये एका दृश्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामुळे दुखापतग्रस्त असलेला राजस्थान रॉयल्सचा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) व्हिल चेअरवरु उभा राहिला. द्रविडनं त्याला होत असलेल्या त्रासाची पर्वा न करता तरुण खेळाडूचं उभं राहून कौतुक केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

11 सिक्स आणि 7 फोर

वैभव सूर्यवंशीनं 101 रॅन्सच्या खेळीत 11 सिक्स आणि 7 फोर लगावले. त्यानं यावेळी मनिष पांडे (19 वर्ष 253 दिवस), ऋषभ पंत (20 वर्ष आणि 218 दिवस) आणि देवदत्त पडिक्कल (20 वर्ष 289 दिवस) यांना मागे टाकत आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात सेंच्युरी करणारा भारतीय होण्याचा रेकॉर्ड केला.

Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन?

नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )

आयपीएल इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची वेगवान सेंच्युरी आहे. यापूर्वी ख्रिस गेलनं 30 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली होती. ही कोणत्याही भारतीयाची सर्वात वेगवान आयपीएल सेंच्युरी आहे. वैभवनं युसूफ पठाणचा 37 बॉलमध्ये सेंच्युरीचा रेकॉर्ड मोडला. 

सेंच्युरीनंतर काय म्हणाला वैभव

वैभवनं या ऐतिहासिक खेळीनंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना तो म्हणाला की, 'ही खूप चांगली जाणीव आहे. आयपीएलमध्ये माझी पहिलीच सेंच्युरी असून ही माझी तिसरी इनिंग आहे. या स्पर्धेपूर्वी जो अभ्यास केला आहे, त्याचे फळ मिळत आहे. मी फक्त बॉल पाहतो आणि खेळतो. जैस्वालसोबत बॅटिंग करणे हा खूप चांगला अनुभव आहे. तो मला काय करायचं हे सांगतो. मला पॉझिटिव्ह राहण्यास मदत करतो. 

आयपीएलमध्ये सेंच्युरी करणे हे माझं स्वप्न होतं. ते आज पूर्ण झालं. कोणतीही भीती नाही. मी फार विचार करत नाही. मी फक्त खेळण्यावर लक्ष केंद्रीत करतो.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: