जाहिरात
Story ProgressBack

डोंगराएवढी आव्हानं पार करत विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र

ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधातला लढा, त्यानंतर गुडघ्याची शस्त्रक्रीया या सर्वांचा सामना करत विनेशने ऑलिम्पिक तिकीट मिळवत स्वतःला सिद्ध केलं आहे.

Read Time: 2 min
डोंगराएवढी आव्हानं पार करत विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र
नवी दिल्ली:

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये आंदोलनात आघाडीची भूमिका घेतलेल्या विनेश फोगटने अखेरीस पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. सरकारी यंत्रणेविरोधातला लढा आणि त्यातच शस्त्रक्रीया अशा दुहेरी आव्हानांचा सामना विनेशने या काळात केला. इतकच नव्हे आपलं वजन  कमी करत विनेशने दुसरा वजनी गट निवडला. शस्त्रक्रीया झाल्यानंतर डॉक्टरांनी विनेशला हा निर्णय घेण्यामध्ये धोका असल्याचं सांगितलं होतं. परंतु हार न मानता विनेश जिद्दीने 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेत उतरली आणि तिने अखेरीस पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

कसं मिळालं विनेशला ऑलिम्पिकचं तिकीट?

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे Asian Qualifying Tournament स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विनेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या लॉरा गानीक्झीवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवत ऑलिम्पिकसाठीचं तिकीट मिळवलं. सहा मिनिटापेक्षा जास्त चाललेल्या सामन्यामध्ये विनेशने तिन्ही फेऱ्या जिंकताना आपल्या प्रतिस्पर्धीला एकही गुण जिंकण्याची संधीच दिली नाही.

ऑलिम्पिक तिकीट मिळवेपर्यंत विनेशने केला प्रचंड संघर्ष -

काही महिन्यांपूर्वी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलेल्या खेळाडूंमध्ये विनेश फोगटही सहभागी होती. यावेळी दिल्ली पोलिसांनी खेळाडूंचा बराच संघर्षही झाला. यादरम्यान विनेश कुस्तीला रामराम करते की काय अशीही परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विनेशने खेळत राहण्याचा निर्णय घेतला.

परंतु संकट काहीकेल्या विनेशची पाठ सोडत नव्हती. 53 किलो वजनी गट जो विनेशचा हक्काचा वजनी गट मानला जातो. त्या गटात भारताकडून अंतिम पांघल या युवा खेळाडूने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. यानंतरही विनेश थांबली नाही. तिने पुन्हा तयारीला सुरु केली असता तिच्या गुडघ्याची दुखापत बळावली, ज्यामुळे तिच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

विनेश फोगटचा वजन कमी करायचा निर्णय -

शस्त्रक्रीया आणि दुखापतीमधून सावरल्यानंतर विनेशने ऑलिम्पिकसाठी आपला वजनीगट बदलण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2023 मध्ये सरावाला सुरुवात केल्यानंतर विनेश फोगट 59 किलोची होती. परंतु ऑलिम्पिक खेळण्याची संधी हातून जाऊ नये याकरता विनेशने 9 किलो वजन कमी करत नव्याने मैदानात उतरण्याचं ठरवलं. अखेरीस आपला हा निर्णय खरा ठरवत विनेशने ऑलिम्पिकसाठीचं तिकीट मिळवत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं.

हे ही वाचा - एका मोठा खेळाडू होणार आऊट! पाहा कशी असेल वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

53 किलो वजनी गटातून भारताच्या अंतिम पांघलने ऑलिम्पिक तिकीट जिंकलं आहे. त्यामुळे विनेशने आपला वजनी गट बदलण्याचा निर्णय घेतला नसता आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या जवळेच व्यक्ती व सध्याचे WFI अध्यक्ष संजय सिंग यांनी फक्त कोटा जिंकलेल्या खेळाडूंना पॅरिसला पाठवायचं ठरवलं असतं तर विनेशचं स्वप्न धुळीस मिळालं असतं. याचसाठी विनेशने आपलं वजन 50 किलोपर्यंत आणायचं ठरवलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination