
IPL 2025: आजपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळला जाईल. जगभरातील क्रिकेट प्रेमी आयपीएल सामन्यांचा प्रत्यक्ष थरार पाहण्यासाठी उत्सुक असून त्याची तिकीट विक्रीही सुरु झाली आहे. कशी कराल आयपीएल सामन्यांची तिकीट खरेदी? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा इंडियन प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याने होईल. आयपीएलचे दुपारचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होतील, तर संध्याकाळचे सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होतील.
आयपीएल 2025 ची तिकिटे ऑनलाइन कशी बुक करावी?
तुम्ही तुमच्या घरच्या आरामात आयपीएल तिकिटे ऑनलाइन सहजपणे बुक करू शकता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप निश्चित बुकिंग प्रक्रिया जाहीर केलेली नसली तरी ऑनलाईन तिकीटे मिळवता यतील. आयपीएल सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या सामन्याचे तिकीट 400 ते 50 हजार रुपयांदरम्यान आहे.
आयपीएलची टीम आणि स्टेडियमनुसार सामन्यांच्या तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. बुकमाय शो आणि पेटीएम इनसाइडर तसेच बॉक्स ऑफिसवरूनही तुम्ही तिकिटं खरेदी करू शकता. त्याचबरोबर आयपीएलच्या काही टीम्स आपल्या अधिकृत वेबसाईटवर सामन्यांची तिकिटंही विकत घेऊ शकतात.
काय आहे प्रक्रिया?
१. BookMyShow, Paytm, IPLT20.com सारख्या बुकिंग वेबसाइटना भेट द्या.
२. आता तुम्हाला जो सामना पहायचा आहे त्याचे स्टेडियम निवडा.
३. तुमच्या पसंतीची सीट श्रेणी निवडा जसे की जनरल, मिड रेंज, प्रीमियम किंवा व्हीआयपी.
४. चेकआउट करण्यासाठी पेमेंट तपशील प्रविष्ट करा.
५. तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा UPI किंवा नेट बँकिंग वापरून पेमेंट करा.
६. तुम्हाला ईमेल किंवा एसएमएसद्वारे पुष्टीकरण मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world