आयपीएल २०२४च्या सीगमध्ये सगळ्या संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. आतापर्यंत अकूण २६ मॅच खेळल्या गेल्या आहेत. प्रत्येक सामन्यानंतर स्कोअरबोर्डवर प्रभाव पडतो. प्लेऑफमध्ये जागा मिळविण्यासाठी संघांची लढाई सुरू आहे. दुसरीकडे, गोलंदाजांमध्येही अव्वल स्थानासाठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला 'पर्पल कॅप' दिली जाते. मुंबई इंडियन्सचा वेगवान बॉलर जसप्रीत बुमराह आणि राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्रने सारख्याच विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 10 विकेट घेतल्या आहेत. मात्र जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. कारण बुमराहचा इकॉनॉमी रेट युझवेंद्र चहलच्या तुलनेत चांगला आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या जसप्रीत बुमराहने 5 मॅच मध्ये एकूण 20 ओवरमध्ये 119 रन्स दिल्या आहेत. त्याने 5.95 च्या इकोनॉमी रेटने 10 प्लेअर्सच्या विकेट्स घेतल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 21 रन्स देत पाच खेळाडूंची विकेट घेतली होती. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल आहे. त्याने 5 सामन्यात 7.33 च्या इकोनॉमीने 10 प्लेअर्सच्या विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिझुर रहमान आहे. त्याने 4 मॅचमध्ये 8 च्या इकोनॉमी रेटने 9 प्लेअर्सच्या विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद आहे. त्याने 6 मॅचमध्ये 8.79 च्या इकोनॉमी रेटने 9 प्लेअर्सच्या विकेट्स घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग आहे. त्याने 5 मचमध्ये 8.72 च्या इकोनॉमी रेटने 8 प्लेअर्सच्या विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपलाही अव्वल स्थानी येण्याची संधी आहे. तीन खेळाडूंची विकेट जर त्याने घेतली तर तो अव्वल स्थान गाठू शकतो. ही चुरशीची लढत कसं वळण घेईल हे आपल्याला आणखी काही सामने झाल्यावरचं समजेल.
पर्पल कॅप हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाणारी कौतुकाची थाप म्हणालात तरी काय वावगं नाही. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप आणि 15 लाख रुपयांसह ट्रॉफी दिली जाते. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने पर्पल कॅप जिंकली होती. यंदाच्या आयपीएल सामन्यात शमी खेळत नाही आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली आणि आता आराम करत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेलाही मोहम्मद शमी मुकणार आहे.