
Australia vs South Africa: दक्षिण आफ्रिकेने अखेर गेल्या 27 वर्षांचा दुष्काळ संपवला. आफ्रिकेनं शनिवारी ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनं पराभूत करत लॉर्ड्समध्ये WTC फायनलचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर एखादी आयसीसी (ICC) स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी त्यांनी 1998 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते, ती त्यांची अखेरची मोठी आयसीसी स्पर्धा होती. त्यानंतर तब्बल 27 वर्ष सातत्यानं निराशा सहन करत आफ्रिकेनं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशिप (Test Championship) आपल्या नावावर केली.
दक्षिण आफ्रिकेच्या फायनलमधील विजयाची 4 मोठी कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कागिसो रबाडाचा कहर
फायनलमध्ये पहिल्याच दिवसापासून दक्षिण आफ्रिकेसाठी दिशा ठरवण्याचे काम त्यांच्या स्टार फास्ट बॉलर कागिसो रबाडाने केले. रबाडा नुकताच डोप टेस्टमध्ये (Dope Test) अयशस्वी ठरल्याने आयपीएलमध्ये (IPL) खेळू शकला नव्हता. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेटसह मॅचमध्ये एकूण 9 विकेट घेऊन ऑस्ट्रेलियन बॅटिंगला अक्षरशः खिळखिळे केले. त्याची ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयामागे एक मोठे कारण ठरली.
मार्करामची भिंत
पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ओपनर मार्करम खातेही उघडू शकला नव्हता, परंतु, टीमला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा त्यानं जबाबदारी घेत 136 रन्सची खेळी केली. त्याची ही खेळी पुढील कित्येक वर्ष लक्षात राहणार आहे.
मार्कराम दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलिया आणि विजेतेपदात एक भिंतच बनला होता. त्याच्या चिवट खेळीमुळेच दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित झाला. याच खेळीमुळे त्याला सामनावीर (Player of the Match) देखील घोषित करण्यात आले.
( नक्की वाचा : WTC Final : मार्करामचा पराक्रम, दक्षिण आफ्रिका चॅम्पियन! ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पटकावले ऐतिहासिक विजेतेपद )
टेंबा बावुमाचा कॅप्टन्स नॉक
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा सेंच्युरी पूर्ण करू शकला नाही. पण, त्यानं आणि मार्करामनं तिसऱ्या विकेट्ससाठी 147 रन्सची पार्टनरशिप केली. याच पार्टरनशिपमुळे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न भंगले. या पार्टनरशिपमध्ये बावुमानं 5 फोरसह 66 रन्सची खेळी खूपच महत्त्वाची आहे.
जान्सेन आणि एन्गिडिचा दम
मार्को जान्सेन आणि लुंगी एन्गिडी यांनी त्यांची उपयुक्तता सिद्ध केली. जान्सेननं पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडिने दुसऱ्या इनिंगममध्ये तीन महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world