
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेटच्या अंतिम सामना कोणत्या दोन संघात होणार याबाबतची उत्सुकता होती. यासाठी तीन संघामध्ये स्पर्धा होती. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रीका हे तीन संघ होते. दक्षिण अफ्रीका संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक ठरलेल्या पहिल्या कसोट सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेटच्या अंतिम सामन्याचं आपलं तिकीट फिक्स केलं आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघा पैकी एक संघ अंतिम सामन्यात पोहचू शकतो. त्यामुळे अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिके विरुद्ध ऑस्ट्रेलिया किंवा भारताचा सामना होवू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सेंचुरियन पार्कवर दक्षिण अफ्रीका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला होता. हा सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्या डावात अफ्रीके समोर 148 धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेची अवस्था एक वेळ 8 बात 99 धावा अशी झाली होती. त्यावेळी पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. त्यावेळी फास्ट बॉलर असलेला रबाड शेवटपर्यंत क्रिझवर उभा राहीला. त्याने नवव्या विकेटसाठी मार्को जानसेन बरोबर 50 धावांची अफलातून भागीदारी करत संघाला दोन विकेटने विजय मिळवून दिला. रबाडाने 26 बॉलमध्ये 31 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रीकेचा विजय सुकर झाला.
या विजयमुळे दक्षिण अफ्रीकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेटच्या अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे. अंतिम सामन्यात पोहचणारी अफ्रीका पहिली टीम ठरली आहे. दक्षिण अफ्रीकेचा संघ पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. अफ्रीकेने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 7 विजय मिळवले आहेत. तर 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. 1 सामना अनिर्णित राहीला आहे. अफ्रीकेचे एकूण अंक 88 झाले आहेत. तर विजयाची टक्केवारी ही 66.77 आहे. ही टक्केवारी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया भारता पेक्षा जास्त आहे.
या सामन्यात पाकिस्तानने जोरदार खेल केला. शिवाय तीन वर्षानंतर संघात परतलेल्या मोहम्मद अब्बास जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने अफ्रीकेच्या संघाला एका मागून एक धक्के देत सहा जणांना आऊट केले. त्यावेळी पाकिस्तान विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र त्यांच्या तोंडचा खास अफ्रीकेने हिरावला. रबाडा आणि मार्को जानसेन यांची जोडी पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडता आली नाही. मार्को जानसेन याने 16 धावा तर रबाडाने 31 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण अफ्रीकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघात अंतिम सामन्यात पोहचण्याची चुरस असेल. भारताचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. या दौऱ्यात उरलेले दोन्ही सामने भारताने जिंकल्यास भारताला अंतिम सामन्यात जाण्याची संधी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा अजून शिल्लक आहे. त्यामुळे ते सामने ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास त्यांनाही अंतिम सामन्यात जाता येणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे 106 तरा भारताचे 114 गुण आहेत. असं असलं तरी जिंकण्याच्या टक्केवारीत ऑस्ट्रेलिया 58.89 टक्के तर भारत 55.88 टक्क्यांनी तिसऱ्या स्थानावर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world