आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होतंय. तब्बल सात दशकानंतर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन हे दिल्लीत करण्यात आलंय. या संमेलनाचं आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे. तीन दिवस दिल्लीच्या, तालकटोरा या स्टेडियम वरती अठ्ठ्याण्णवावं हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.