बाबा सिद्दीकी हत्येतील आरोपीचा एक व्हिडिओ समोर आलाय.झीशान अख्तर याचा हा व्हिडिओ असून त्यातून त्याने आशियाच्या बाहेर असल्याचा दावा केलाय. भारताबाहेर असल्याचा दावा अख्तरने केलाय.तर जे त्याचे किंवा टोळीचे शत्रू आहेत त्यांना गोळ्या घालण्याची धमकीही अख्तरने दिली. सध्या या व्हिडिओची पडताळणी केली जातेय.या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती आणि तो काय दावा करत आहे याची चौकशी केली जात आहे.