नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याशी अरेरावीने संवाद करत व्हिडीओबद्दल जाब विचारल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी पिता-पुत्रासह एका महिलेला ताब्यात घेतले आहे. सोमवारी महाजन यांच्या सभेत काही युवक हे अमली पदार्थाचे सेवन करतानाचा व्हिडीओ दाखविण्यात आला होता. हा व्हिडीओ खोटा असल्याचे सांगून महाजन यांच्याशी अरेरावीने बोलून जाब विचारणारे संशयित सुनील माधव पाटील व निशांत सुनील पाटील या पिता-पुत्रासह महिलेला ताब्यात घेत अटक केली होती.