Mahashivratri 2026 | अहिल्यानगरच्या स्वयंभू बेलेश्वर मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी | NDTV मराठी

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अहिल्यानगर शहरानजीक श्री क्षेत्र बेलेश्वर स्वयंभू महादेव मंदिरात शिवभक्तांची मोठी मांदियाळी पहायला मिळते. काल मध्यरात्रीपासूनच 'हर हर महादेव' च्या गजरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या... बेलाच्या झाडाखाली प्रकटलेले हे स्वयंभू शिवलिंग पुरातन काळापासून साधू-संतांची तपोभूमी राहिले आहे...विशेषतः ऐतवारनाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या क्षेत्रात आजही नाथपंथी साधूंच्या हस्ते विधिवत पूजा, महाआरती व नैवेद्य अर्पण करण्यात येतो... मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी....

संबंधित व्हिडीओ