पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड घडलीय...तब्बल 6 वर्षानंतर भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले आहेत...2027 मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती जाहीर केलीय...भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पत्रकार परिषद घेत या युतीची अधिकृत घोषणा केली..या युतीची घोषणा करताना अमित शाह यांनी अकाली दलासोबतच्या जुन्या मैत्रीचा उल्लेख केला. जुन्या मित्राचं स्वागत अशी प्रतिक्रिया देतानाच अकाली दलाचाच मुख्यमंत्री होणार अशी ग्वाही देखील अमित शाहांनी दिलीय.