Uttar Pradesh | सपा-Congress मध्ये जागावाटपाची दुसरी बैठक, समाजवादी पार्टी Congress ला 26 जागा देणार

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरुच आहेत. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मात्र त्यात काँग्रेसनं थेट १३० जागा मागितल्या तर सपानं मात्र २६ जागा देण्यावर सहमती दर्शवलीय अशी माहिती सपा खासदार राम गोपाल यांनी दिली तर आम्ही कोणाकडे भीक मागणार नाही, अशा पवित्रा काँग्रेसने घेतलाय. काँग्रेसनं पहिल्या बैठकीत १८१ जागांची मागणी केली होती त्यानंतर काँग्रेसनं १३० जागांवर तडजोड केलीय. उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांपैकी केवळ २६ जागा काँग्रेसला देण्यामागे २०२२मधील निकालाचा संदर्भ आहे. २०२२मध्ये काँग्रेसला या २६ जागांपैकी केवळ २ जागांवरच विजय मिळाला होता तर ४ जागांवर दुसऱ्या नंबरवर १६ जागांवर डिपॉझिटच जप्त झालं होतं.

संबंधित व्हिडीओ