जलसिंचनाच्या फाईलवरून Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट, गौप्यस्फोटावर कुणी काय प्रतिक्रिया दिली? NDTV

जलसंपदा खात्यातल्या भ्रष्टाचारावरून अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.सन 1999 पूर्वी सत्तेवर असलेल्या युतीच्या कार्यकाळात पक्षनिधीसाठी जलसिंचन विभागांतर्गत असलेल्या पुरंदर सिंचन योजनेचे पैसे वाढवल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. निवडणुकीपुर्वी पक्षनिधीसाठी या योजनेचा खर्च 100 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला होता, त्यानंतर विलासराव देशमुख सरकारच्या कार्यकाळात हे खातं माझ्याकडे आलं, आणि आपण या प्रकरणाची चौकशी केली असता, एका निवृत्त अधिकाऱ्याने कबुली दिली की, तत्कालीन जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी पक्षनिधीसाठी 100 कोटी रुपये आपल्याला वाढवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. अजित पवार आरोप करत असलेल्या कालखंडात म्हणजे 1999 साली जलसंपदा मंत्रिपदी भाजपचे एकनाथ खडसे होते. त्यामुळे अजित पवारांचा निशाणा भाजपवर असल्याचं स्पष्ट होतंय.

संबंधित व्हिडीओ