अमरावती शहरालगतच्या मातोश्री वृद्धाश्रम परिसरातील रत्नापूर तलावात बुडालेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये प्रवेश शैलेश कडू आणि भावेश चव्हाण या 17 वर्षीय तरुणांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, आठ तरुण फिरण्यासाठी आले असताना हा दुर्दैवी प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती