माझी लढाई धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचारा विरोधात आहे, त्यांच्या गुंडगिरी विरोधात आहे, त्यांनी मोठ्या केलेल्या कराड सारख्या व्यक्तींनी विरोधात आहे, पण माझी लढाई त्यांच्या आजाराविरोधात नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलीय.तसंच बेल्स पाल्सी हा आजार काही इतका गंभीर आजार नाही असं सांगत धनंजय मुंडे यांनी लवकर बरं व्हावं, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्यात. याशिवाय कृषी साहित्य वाटपात जवळपास 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं सांगत, शुक्रवारी घोटाळ्याबाबतच्या पुराव्याचा पुढचा अंक जाहीर करणार, असल्याचंही दमानिया म्हणाल्यात.