ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे यांनी हा आरोप करत चांदी वाटपासाठी वापरला जाणारा एक टेम्पो पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती दिली आहे. प्रचारावर बंदी असताना आणि मतदानाला काहीच तास उरले असताना हा प्रकार घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे. वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपानुसार, मतदारांना थेट चांदीच्या वस्तू देण्याऐवजी चांदीच्या वस्तू असल्याचे सांगून प्रत्यक्षात चांदीचा कोट असलेल्या वस्तू वाटप करण्यात आल्या. यामुळे मतदारांची फसवणूक झाली असून, हा प्रकार निवडणूक आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन असल्याचा दावा मोरे यांनी केला आहे.