या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये एकोणीस बांगलादेशी नागरिकांना अटक केलेली आहे. पोलिसांनी ठाणे आणि नवी मुंबई इथून तेरा जणांना अटकेत घेतलंय. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. तेरा बांगलादेशी नागरिकांमध्ये सात पुरुष आहेत आणि सहा महिला आहेत. याशिवाय जालना आणि सोलापुरातनं प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय