Beed|कोरड्या दुष्काळाचे सावट; विहिर,बोर कोरडी पडल्याने शेतकऱ्याने बैल धुवण्यासाठी गाठलं वॉशिंग सेंटर

बीड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे.छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडलेत, विहिरींनीही तळ गाठलाय. अशा परिस्थितीत आज बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण, बैलपोळा साजरा होतोय. पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा राजाला आंघोळ घालून सजवतो, त्याची पूजा करतो आणि मिरवणूक काढतो. मात्र यंदा दुष्काळाने ही परंपराही अडचणीत आणलीय. बीडमधील शेतकरी विनीत काळे यांच्या शेतातील विहिरीला आणि बोरला पाणीच नसल्याने, आपल्या लाडक्या सर्जा राजाला आंघोळ घालण्यासाठी त्यांना चक्क वॉशिंग सेंटर गाठावं लागलं. दुष्काळाची ही झळ आता बळीराजाच्या सणालाही बसलीय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी...

संबंधित व्हिडीओ