Latur Drought| रेणापूरमध्ये दुष्काळी मदतीसाठी MNS चे आंदोलन, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी

दुष्काळ जाहीर झाला असला तरी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आंदोलन करण्यात आलं. मनसेचे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील रेणुका देवीला दंडवत घालत सरकारला सद्बुद्धी यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी साकडं घातलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमच्या संयमाची भाषा सरकारला कळत नसेल तर ठोकशाहीच्या भाषेत सरकारला जाब विचारू, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी. Latur Drought | MNS protests in Renapur for drought relief; demands immediate assistance for farmers.

संबंधित व्हिडीओ