Beed | सरपंच Santosh Deshmukh प्रकरणातील मोठी अपडेट,आरोपी जयराम चाटेला तात्पुरता दिलासा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिलाय.भावाच्या बाराव्या विधीसाठी गावी जाण्यास न्यायालयानं परवानगी दिलीय.आरोपीच्या वकिलांनी सर्व अटींचे पालन करण्याची तसेच पोलिस बंदोबस्ताचा खर्च भरण्याची तयारी दर्शवली होती.मात्र आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याने त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची मर्यादित परवानगी मंजूर केली आहे.

संबंधित व्हिडीओ