उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कटकारस्थानाचा पक्ष असल्याचा आणि 'हिंदुत्वाचा फुगा फुटल्याचा' आरोप करत हल्लाबोल केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. डोंबिवलीत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर यांनी आपल्या पत्नीसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला.