राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या ९ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या त्यांच्या डॉक्टर पत्नीच्या मृत्यूमुळे गूढ वाढले आहे. या घटनेनंतर पत्नीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसल्याचा गंभीर आरोप करत वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.