बीडमधील डुप्लिकेट सही घोटाळ्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यात एका जिल्हाधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती आहे. या जिल्हाधिकाऱ्याचे नाव अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. दोन अव्वल कारकुनांमधील वादातून हा घोटाळा उघडकीस आला. एका टेक्नोसॅव्ही जिल्हाधिकाऱ्याने ५ जणांचे फोन आणि सीडीआर तपासल्यावर हा मोठा घोटाळा समोर आला.