BJP ने पराभवाची सवय लावून घ्यावी, Vishal Patil यांच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारला आहे,मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय,सत्तेत एवढे प्रेम का? आहे,हे कळत नाही,पण यापुढे भाजपाने जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी,अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे....तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना प्रत्युत्तर दिलंय....आता जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे.... मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन,की भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष होईल,असं विधान आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी केले आहे, काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉच ची भूमिका असल्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून सांगण्यात आलं होतं,आता जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा होईल, असं सांगितले आहे.

संबंधित व्हिडीओ