नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारे सीसीआय कापूस खरेदी केंद्र एक फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान जागा नसल्यामुळे बंद होतात. आता दहा फेब्रुवारी पासून खरेदीला सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाला असल्यानं सीसीआय केंद्रावरील खरेदी, बंद करण्यात आली आहे मात्र बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी सुरूच आहे.