धनंजय मुंडेंना यांना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालंय. याबाबत धनंजय मुंडेंनी स्वत: पोस्ट करत माहिती दिलीय.कॅबिनेट बैठकांना गैरहजेरी आणि जनता दरबार न भरवण्यावरून मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठली होती. अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे आदेश दिले होते.. मात्र धनंजय मुंडेंनी अजितदादांच्या आदेशालाच हरताळ फासल्याची चर्चा सुरू होती. आता याच चर्चांना धनंजय मुंडेंनी पुर्णविराम दिलाय.