धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्याच्या शिळांना तडे गेल्यामुळे चिंता वाढलीय.आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंदिराची पाहणी केली.मंदिराच्या कळसाचं वजन पुर्वीपेक्षा चारपट वाढल्यामुळे गाभाऱ्याच्या शिळांना तडे गेल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. मात्र मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जोमाने सुरू असून भाविकांना याचा त्रास होणार नाही असं सरनाईकांनी म्हटलंय.