कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील बोगस महारेरा प्रकरणातील साडेसहा हजार रहिवाशी बेघर होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या दहा दिवसात घरे खाली करण्याची नोटीस धाडलीय.याच पार्श्वभूमीवर रहिवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलीय. दरम्यान ज्या विकासकांनी नागरिकांची फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी श्रीकांत शिंदेंनी केलीय.