शिवसेनेच्या मुंबईतील नव्या कार्यकारिणीला अखेर पाच महिन्यानंतर मुहूर्त मिळाला. येत्या एकवीस तारखेपर्यंत शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे. एकोणीस जानेवारी रोजी मुंबईतील, शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती तेव्हापासून शिवसेना मुंबईत कार्यकारिणी नसताना पक्षाचं काम सुरु होतं मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नवे विभागाध्यक्ष आणि शाखा प्रमुख जाहीर केले जाणार आहेत.