Opposition March to ECI| हे डरपोक सरकार, व्होट चोर गादी सोड! निवडणूक आयोगाविरोधात INDIA आघाडी आक्रमक

दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा आज मोर्चा . हा मोर्चा संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत (निर्वाचन सदन) काढला जाणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’ आणि मतदार यादीतील गैरप्रकारांचे गंभीर आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः, बिहारमधील मतदार यादी पडताळणी आणि लोकसभा निवडणूक निकालांवरील संशयामुळे हे आंदोलन होत आहे. इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असून, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्याची मागणी करणार आहेत

संबंधित व्हिडीओ