राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 'गणेश नाईक कसलेले पैलवान असून, तेच अंतिम विजयी ठरतील,' असे राऊत पालघर येथे म्हणाले.