Global News| मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती, राहुल गांधी यांचा आक्षेप फेटाळला

मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आलीय.पंतप्रधानांच्या पॅनलनं सोमवारी रात्री हा निर्णय घेतला.तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींचा आक्षेप फेटाळून मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आलीय.तर विवेक जोशीही आयुक्तपदी असणार आहेत.ज्ञानेशकुमार हे 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. केरळ कॅडरचे अधिकारी असलेले ज्ञानेशकुमार मुळचे उत्तर प्रदेशच्या आग्र्याचे आहेत.राजीवकुमार यांचा कार्यकाळ १८ फेब्रुवारी रोजी संपतोय.त्यामुळे सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त पदी निवड केलीय.ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ आता २६ जानेवारी २०२९ रोजी संपणार आहे.काँग्रेसनं या निवडीवर आक्षेप घेतला आहे. सुप्रीम कोर्टात या विषयी सुनावणी सुरु असल्याने निवड समितीची बैठक स्थगित करण्याची मागणी केली होती.सुप्रीम कोर्टात या संबंधी 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बैठक स्थगित करण्याची मागणी केली होती.

संबंधित व्हिडीओ