चीनची जमिनीची हाव काही कमी होत नाही. भारताच्या जम्मू काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्यावर आता चीननं दावा केलाय. केवळ दावा करून थांबलेला नाही तर ती जमीनच आमची आहे असंही बेधडकपणे चीन सांगत सुटलाय. अर्थात भारतानं शक्सगाम खोरं हा सार्वभौम भारताचा भाग असल्याचं स्पष्ट केलंय, तिथल्या चीनी बांधकामावरही भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पाहूया या शक्सगाम खोऱ्यावरून भारत आणि चीनमध्ये काय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आणि नेमकं हे खोरं इतकं महत्त्वाचं का आहे.