दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गोकुळने म्हैस आणि गाय दुधाच्या खरेदी दरात एक रुपयाची वाढ जाहीर केली आहे. २१ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होणार असून, यासाठी ३५ कोटींची तरतूद आहे. वसुबारसच्या शुभदिनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.