हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली... या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 10 ते 12 जण जखमी आहेत.. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे आग विझवण्याच्या प्रयत्नात एका अग्निशमन वाहनालाही आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात फटाके साठवण्यात आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.