राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.काँग्रेस खासदार विशाल पाटलांना भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिलीय.जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा.. असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी थेट पत्रकार परिषदेत विशाल पाटलांना खुली ऑफर दिलीय.दरम्यान, चंद्रकांत पाटलांची ऑफर म्हणजे आपण चांगलं काम करतोय याची पोच पावती आहे, पण आपण भाजपा सोबत जाणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार विशाल पाटलांनी दिलीय.