गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय.रंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर हटवावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यवापी आंदोलन करणार आहे.त्यांच्याकडून राज्यभरातील तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.. आज राज्यभरात याबाबत आंदोलन करण्यात येणार आहे.दरम्यान, कारवाई केली नाही तर पुन्हा कारसेवा सुरु करण्याचा इशारा त्यांनी दिलाय.दरम्यान, आज राज्यभरात हिंदू संघटनांकडून औरंगजेबाची खुलताबाद येथील कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनं होणार आहेत..विश्व हिंदु परिषदेकडून अल्टिमेटम देण्यात आलाय.या पार्श्वभूमीवर कबर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान यावरुन संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय.400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघालेत मात्र 3000 शेतकऱ्यांच्या चिता जळाल्या आहेत त्याच्यावर बोला असा टोला राऊतांनी लगावलाय.त्याचबरोबर काही लोक महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. कोकणात कधीही दंगली घडल्या नव्हत्या.अशी टीका संजय राऊतांनी केलीय.