नागपूर पेपर फुटीप्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आलीय.बोर्डाचा आणि कोचिंग क्लासचा पेपर एकसारखा कसा, या प्रश्नाचे कोडे उलगडलंय.पेपर सेट करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकानेच बोर्डचा नियमाचा आणि गोपनियेतेचा भंग केलाय.उमरेड पेपरफुटी प्रकरणात टार्गेट कोचिंग क्लासेचसे अतुल चौधरी आणि निवृत्त उपप्राचार्य प्रा. सतीश खर्चे यांच्या अटकेनंतर हा नवीन खुलासा झालाय.2023चा बोर्ड पेपर सेंटर म्हणून सेट केलेला बहुतांश प्रश्न आणि 2026च्या रसायनशास्त्र बोर्डच्या पेपरमध्येही असल्याचं समोर आलंय.दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय, उमरेड पोलिसांकडून पेपरफुटी आणखी काही धागेदोरे आहे का याचा तपास सुरू आहे.