पालघर तालुक्यातील मनोर हद्दीतील बोरशेती जंगलात रानडुकरांच्या शिकारीसाठी गेलेल्या शिकाऱ्याने सावज समजून सहकाऱ्यांवर गोळीबार केलाय.. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळतीय.. धक्कादायक बाब म्हणजे मृत पावलेल्या दोघांपैकी एकावर शिगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून दुसऱ्या मृत व्यक्तीचा जंगलात गाढून ठेवलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय.. 29 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेबाबत मानोर पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती.. त्यानंतर पोलिसांना घटनेबाबत उलगडा करण्यास तब्बल आठ दिवस लागले. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतल आहे.