#ICCWomensWorldCup #INDvsSA #TeamIndia #NDTVMarathi हिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडीयाने दक्षिण अफ्रीकेच्या संघाला धुळ चारली आहे. 298 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना साऊथ अफ्रीकेने सावध सुरूवात केली. नऊ ओव्हर्समध्ये 51 धावा असताना अफ्रीकेची पहिली विकेट पडली. त्यानंतर आलेल्या अॅनेक बॉशला भारतीय मुलींनी खातंही उघडू दिलं नाही. ती शुन्यावर बाद झाली. तर सूने लुस आणि मेरॅझेन कॅप यांना शफाली वर्मा हिने स्वस्त्यात माघारी पाठवलं. पण एकीकडे विकेट पडत असताना आफ्रीकेची कॅप्टन लॉरा हिने एकबाजू लावून धरली होती. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर ती ही बाद झाली. टीम इंडियाकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर शफाली वर्माने दोन विकेट घेतल्या. रेणूका सिंगने विकेट घेतली नसली तरी टिच्चू बॉलींग करत अफ्रीकेच्या फलंदाजांना बाधून ठेवलं होतं. अखेर दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 246 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने 52 रन्सने विजय मिळवला. भारतीय महिला संघांनी पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं.