तृतीयपंथी देवदासी आणि जोगती यांची मानाची यात्रा म्हणून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव यात्रेकडे पाहिलं जातं. कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि गुजरात मधून देखील तब्बल दोन लाख भाविक कासेगावात दाखल झाले.