एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी काही प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर आहेत.जालन्यातल्या 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची चौकशी करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या पहिल्या कार्यकाळात फडणवीसांनी हा प्रकल्प रद्द केला होता. पण या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळात पुन्हा गती मिळाली होती. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिडको प्रशासनाला आदेश दिलेत. याशिवाय फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दुसरा धक्का दिल्याचंही बोललं जातंय. शिंदेंच्या काळातलं मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचं १४०० कोटींचे टेंडर रद्द करण्यात आलंय. महिला बचत गटाचं काम बंद करून एका खासगी कंपनीला 4 वर्षांसाठी हे काम दिलं गेलं होतं. प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2024 साली निविदाही मागवल्या होत्या. मात्र या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आलीय सध्या हे काम 450 हून अधिक महिला बचत गटा आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केले जाते.पुण्यातील सुमित फॅसिलिटीला हे काम द्यावे यासाठीही वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात असल्याचा आऱोप करण्यात आलाय.. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत.हा एकनाथ शिंदेंसाठी धक्का मानला जातोय.