Kartiki Ekadashi 2025| DCM Eknath Shinde यांच्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न | NDTV मराठी

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न झाली..त्यातच आता त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनाही या पूजेचा मान देण्यात आलाय.. मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची विद्यार्थीनी मानसी आनंद माळी आणि देवडीचा समाधान थोरात या विद्यार्थ्याला हा मान देण्यात आलाय... दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला आहे.. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी दोन विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचा मान मिळावा अशी मागणी केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ