खंडपीठ कृती समितीकडून कोल्हापुरात आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. तब्बल अडतीस वर्ष मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी लढा सुरू आहे. आता या खंडपीठाची मागणी जोर धरती आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या विविध लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठिंबा देखील दिला होता मात्र तरीही, ही मागणी काही अद्याप पूर्ण झालेली नाही. आता राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर नक्कीच कोल्हापूरला खंडपीठ मिळेल. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा सोलापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना या खंडपीठाचा मोठा फायदा होणार आहे.